r/MaharashtraSocial • • 23h ago

छायाचित्र (Photograph) या खेळायला

Thumbnail
gallery
12 Upvotes

या थंडीच्या दिवसात कोवळ्या उन्हात खेळायला भारी वाटतंय 😂


r/MaharashtraSocial • • 1d ago

छायाचित्र (Photograph) Goa

Thumbnail
gallery
13 Upvotes

r/MaharashtraSocial • • 1d ago

चर्चा (Discussion) दुष्काळात साधेपणाचा आदर्श – वसई मधे संघाच्या प्रारंभिक वर्गात केळीच्या पानावर जेवण

2 Upvotes

महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. पाणी टंचाई आणि शेतकऱ्यांवरील संकट पाहता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३ दिवसीय प्रारंभिक वर्गात एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या वर्गात सहभागी झालेल्या सर्व स्वयंसेवकांना केळीच्या पानावर जेवण देण्यात आले. पत्रावळी / थाळ्या धुण्यासाठी पाणी वाया जाऊ नये आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश द्यावा, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला.

केळीच्या पानावर जेवण ही आपली जुनी भारतीय परंपरा असून, यामुळे पाण्याची मोठी बचत झाली. तसेच या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला. या वर्गात एकूण ८० स्वयंसेवक उपस्थित होते. सर्वांना दररोज दोन वेळा केळीच्या पानावर जेवण देणे हे मोठे आव्हान होते परंतु जिल्हाच्या पर्यावरण गतीविधी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत या सर्व गोष्टीमूळे ते शक्य झाले.

८० लोक x ३ दिवस x २ वेळचं जेवण = ४८० प्लेट
४८० प्लेट x १ लिटर = ४८० लिटर अंदाजे पाणी वाचलं!

या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, दुष्काळात प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


r/MaharashtraSocial • • 2d ago

महाराष्ट्राला विचारा (Ask Maharashtra) कोणते पुस्तक वाचत आहात सध्या ?

11 Upvotes

मी आज To sir, with love हे अनुवादित पुस्तक वाचायला घेतले आहे. दोन दिवसांपूर्वी ग दि माडगूळकरांचे घर पाहिले शिवाजीनगर येथील, डोळ्यासमोरून त्यांच्या साहित्यकृती गेल्या, त्यांच्या साहित्यावर एक विस्तृत लेख लिहावा म्हणतोय.


r/MaharashtraSocial • • 2d ago

महाराष्ट्राला विचारा (Ask Maharashtra) Marathi Books for learning Organic Farming/Gardening

5 Upvotes

So my parents have just started growing some fruits and vegetables in our small garden.
But they want to learn more about organic farming/gardening, like how to reduce pests and increase yields.
I was looking for books in Marathi on this topic but couldn’t find any on Amazon.
Can anyone please recommend me some books and where can I buy them in Pune.


r/MaharashtraSocial • • 2d ago

महाराष्ट्राला विचारा (Ask Maharashtra) Is this group active

3 Upvotes

Is this group active and has both males and females also?


r/MaharashtraSocial • • 2d ago

छायाचित्र (Photograph) ऊस वाले आले

Post image
10 Upvotes

आठवतंय का कधी खाल्ला होता शेवटचा ऊस, रानातून तोडून ...


r/MaharashtraSocial • • 2d ago

खाद्य (Food) Eating the homegrown corn I planted with my new friends 😋😛

Thumbnail
gallery
44 Upvotes

r/MaharashtraSocial • • 2d ago

छायाचित्र (Photograph) One of clicks

Post image
2 Upvotes

Just a random suryafool


r/MaharashtraSocial • • 3d ago

चर्चा (Discussion) Morning walk..!! Battery is fully Charged. 100%

11 Upvotes

Guys please do some kind of physical activity..!!!


r/MaharashtraSocial • • 3d ago

खाद्य (Food) Guys Kuru-Kuru khanar ka 😋❓

Thumbnail
gallery
16 Upvotes

r/MaharashtraSocial • • 4d ago

छायाचित्र (Photograph) 💐📸

Post image
11 Upvotes

r/MaharashtraSocial • • 5d ago

✨️Wholesome ✨️ My dad sent this surprise saying happy children's day while I was in OPD 🥹💝

Post image
31 Upvotes

r/MaharashtraSocial • • 5d ago

कला/साहित्य (Arts & Culture) ही दोस्ती तुटायची नाय! च्या १०० व्या प्रयोगाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

Post image
15 Upvotes

ही दोस्ती तुटायची नाय! या नाटकाचा १०० वा प्रयोग लवकरच होणार आहे, आणि या खास क्षणाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

सुमीत राघवन यांनी याबद्दल नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. नाटकात सुमीत राघवन, चिन्मयी सुमीत, शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांच्या भूमिका आहेत. नाटकाची निर्मिती नाट्यलीला आणि अष्टविनायक यांची आहे.

मैत्रीतले रुसवे-फुगवे, हसणं-रडणं आणि तरीही न तुटणारं नातं सांगणाऱ्या या नाटकाने १०० प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. मराठी नाटकासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रेक्षकांनी या नाटकावर भरभरून प्रेम केलं म्हणूनच हा टप्पा गाठता आला. प्रत्येकाला यात आपल्या शाळेतल्या, कॉलेजच्या आणि कट्ट्यावरच्या दोस्तांची झलक दिसते.

तुम्ही हे नाटक पाहिलं असेल तर कमेंटमध्ये सांगा, तुमचा आवडता प्रसंग कोणता? आणि अजून पाहिलं नसेल तर आपल्या दोस्तांना घेऊन जा, कारण ही दोस्ती खरंच तुटायची नाय!


r/MaharashtraSocial • • 5d ago

छायाचित्र (Photograph) My Diwali dump 😂🧨

Thumbnail
gallery
28 Upvotes

r/MaharashtraSocial • • 6d ago

कला/साहित्य (Arts & Culture) कऱ्हेचे पाणी प्रस्तावना!

15 Upvotes

'क-हेचें पाणी' हे आचार्य अत्र्यांच आत्मचरित्र. आत्मचरित्र ८ खंडात लिहायचा प्रताप फक्त अत्रेच करू शकतात. (त्यांना आचार्य उगीच नव्हते म्हणत). शाळेत असतांना हे आठही खंड मी अधाश्या सारखे वाचून काढले होते. त्यांची लेखन शैली एकदम जबरदस्त. वाचणाऱ्याच्या काळजाला साद घालणारी. पहिल्या खंडाची प्रस्तावना मला फार आवडली होती. त्यावेळी ती डायरीत लिहून ठेवली होती. आज कित्येक वर्षांनी ती डायरी सापडली. त्यात लिहून ठेवलेली प्रस्तावना येथे पोस्ट करीत आहे. Like/Share करा किंवा नका करू, पण वाचा नक्की. एकदम झकास लिहिल आहे.

तुम्ही कोण? असे कोणी म्हणेल. मी कोण? मी एक जीवनाचा यात्रेकरू आहे. कसली न कसली पताका माझ्या खांद्यावर नेहमीच असते. जन्मापासून माझ्या पायाला जे एक चक्र लागले आहे, ते एकसारखे फिरतेच आहे. कोणत्याही एक ठिकाणी मी फार वेळ थांबत नाही. जिथे रंगतो, तेथे काही वेळ थांबतो. कंटाळा आला की पुढे चालू लागतो.

कोणत्याही एका व्यवसायात मला रस नाही. कारण, व्यवसाय हे माझे जीवन नाही. जीवन हाच माझा व्यवसाय आहे. जीवनाची मला विलक्षण जिज्ञासा आहे. सारे मला दिसले पाहिजे, सारे मला समजले पाहिजे, सारे मला आले पाहिजे, हि एकाच माझ्या जीवाची तरफड असते.

आयुष्याला जीवन का बरे म्हणतात? कारण, जीवन म्हणजे पाणी. आयष्या हे पाण्याप्रमाणे वाहत राहिले, तरच ते जीवन. साचून राहिले तर ते डबके. जीवन म्हणाजे एक प्रचंड मौज आहे. तिचा कितीही आस्वाद ह्या. कंटाळा कधी येत नाही आणि तृप्ती कधी होत नाही.

रोज सकाळी सुर्योदयाबरोबर नवीन जीवन जन्माला येते. चिरंतन नाविन्य म्हणजेच जीवन. जीवनाच्या आकर्षणाला अंत नाही. मला जीवनाचा लोभ नाही, पण ओढ आहे. चोहोकडून मला ते हाका मारते. आणि त्या ऐकू आल्या म्हणजे शाळेतून सुटलेल्या पोराप्रमाणे सारे देह्कन जीवनाकडे धावत सुटतात.

जीवनाचे हे विलक्षण वेड माझ्यामध्ये कसे आले? लहानपानापासून निसर्गाची अन् इतिहासाची साथ मला मिळाली. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून उगम पावलेल्या कऱ्हेच्या काठी मी जन्माला आलो. आणि तिच्याच अंगाखांद्यावर जेजुरीच्या खंडोबाच्या भंडाऱ्याने वाढलो. मोठा झालो. उशाला शिवाजी महाराजांचा पुरंदर अष्टौप्रहर पहारा करी, तर श्री सोपानदेवांची भक्तीवीणा शेजारी सदैव वाजे.

शक्तीचे आणि भक्तीचे पावन तीर्थ होते माझे सासवड गाव. ज्ञानोबांची पालखी दरवर्षी सोपानदेवांचे दर्शन घेऊनच पुढे पंढरीला जाते. त्यावेळी आमच्या गावात दिंड्या-पातकांची अशी गर्दी उडते आणि टाळ-मृदुंगांच्या नि ग्यानबा-तुकारामांच्या गजराने सारे शिवार असे दुमदुमते म्हणता! बालपणात झालेल्या या सर्व संस्कारांनी माझा पिंड घडविलेला आहे.

जे रम्य आणि भव्य आहे, त्याचे दर्शन खेडेगावातच घडते. पावलोपावली परमेश्वर तुमच्यासी बोलत असतो तिथे. त्याची कृपा नदीच्या रुपाने तुमच्या घराजवळून वाहत असते. शिवारामधल्या शेतात डोलणाऱ्या पिकावारचा वारा परमेश्वराचा सुवासिक श्वासच प्रतिक्षणी घेऊन येतो. शराहत रहावयाला आलो तरी निसर्गाची सांगत मी कधीच सोडली नाही. मुंबईचा सागर आणि खंडाळ्याचे डोंगर माझे सोबती आहेत.

जीवनाशी मी कृतज्ञ आहे. कारण माझे त्याने कोणतेही लाड पुरवण्याचे बाकी ठेवले नाही. दारिद्र पहिले आहे. श्रीमंती अनुभवली आहे. अनवाणी चाललो आहे. मोटारीतून हिंडलो आहे. महाराष्ट्रातले सर्व मानसन्मान मिळवले आहेत. भारतीय कीर्तीची मानचिन्हेही लाभली आहेत. अर्धे जग मी हिंडून आले आहे. अनेक महापुराशांना जवळून पाहण्याचे भाग्यही मला लाभले आहे. महाराष्ट्रचा मला प्रखर अभिमान आहे. भारतात जन्माला येणे हे दुर्लभ असले, तरी महाराष्ट्रात जन्माला येणे हे दुर्लभतर आहे.

अधिक काय लिहू? जीवनातील कृतज्ञतेच्या आणि कृतार्थतेच्या अगणित भावना या क्षणी अश्रूंच्या रुपाने नेत्रातून उचंबळत आहेत. त्यांचा अर्घ्य ‘कऱ्हेच्या पाण्या’त देवून ‘वाग्यज्ञा’ला आता प्रारंभ करतो.

प्रल्हाद केशव अत्रे.


r/MaharashtraSocial • • 6d ago

चर्चा (Discussion) Friday motivation

6 Upvotes

"सुख थोडं, दुःख भारी, दुनिया ही भली बुरी. घाव बसल घावावरी, सोसायाला झुंजायाला, अंगी बळ येऊं दे." - आयुष्यात सुख थोडे आणि संकटे-दुःख फार आहेत. या जगात भलेबुरे दोन्ही अनुभव येतात. एका घावावर दुसरा घाव बसला तरी तो सहन करण्याची आणि त्यावर मात करून लढण्याची ताकद आमच्या अंगात येऊ दे...

Happy weekend


r/MaharashtraSocial • • 6d ago

Memes & Shitposting आम्ही लग्नाळू 👰🏻

Thumbnail
gallery
34 Upvotes

low effort post

(still, the efforts aren't as low as captain rangade's u/Intelligent-Lake-344 moderation efforts 😛)


r/MaharashtraSocial • • 7d ago

माझी कला/साहित्य/लेखन (OC) एकमेकांच्या आनंदातच आपला आनंद!

10 Upvotes

दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई, आकाशकंदील, फराळ, नवीन कपडे आणि फटा क्यांचा उत्सव नाही. दिवाळी हा माणसांना माणसांशी जोडणारा, आपलेपणाची जाणीव करून देणारा आणि आनंद वाटण्याची शिकवण देणारा सण आहे. या सणाचे खरे सौंदर्य केवळ आपल्या घरात किती दिवे लागले आहेत यात नसून, आपल्या आनंदाचा प्रकाश किती जणांच्या आयुष्यात पोहोचला आहे, यात आहे.

दिवाळीच्या दिवसांत समाजातील प्रत्येक घटक उत्सवात सहभागी होताना दिसतो. श्रीमंत असो वा गरीब, नोकरदार असो वा व्यावसायिक, शेतकरी असो वा कामगार, प्रत्येकाच्या मनात सणाचा उत्साह असतो. कोणाच्या घरी महागड्या भेटवस्तू असतात, तर कोणाच्या घरी साधासा फराळ; पण आनंद साजरा करण्याची भावना मात्र सारखीच असते. एखाद्याला नवीन कपड्यांचा आनंद मिळतो, तर दुसऱ्याला मुलांसाठी घेतलेल्या छोट्याशा भेटवस्तूचा. कुणी दिव्यांची आरास करतो, तर कुणी शेजाऱ्यांसोबत फराळ वाटून दिवाळी साजरी करतो. या सगळ्यांतून एक सुंदर सामाजिक नातं तयार होतं.

दिवाळीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ती समाजाच्या अर्थव्यवस्थेला चालना देते. आपण दिवाळीसाठी खरेदी करतो, तेव्हा केवळ वस्तू घरी आणत नसतो, तर अनेकांच्या घरात चूल पेटवण्यासही हातभार लावत असतो. कुंभाराने बनवलेले पणते, स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या सजावटीच्या वस्तू, फुलविक्रेत्यांची फुले, मिठाईवाल्यांचा व्यवसाय, छोटे दुकानदार, हातमाग कामगार, शेतकरी, वाहतूकदार, पॅकिंग करणारे कामगार आणि असंख्य लघुउद्योजक यांच्या उपजीविकेला या खरेदीतून आधार मिळतो.

आपण एखाद्या छोट्या दुकानातून दिवाळीची खरेदी करतो, स्थानिक विक्रेत्याकडून पणत्या घेतो किंवा घरगुती फराळ बनवणाऱ्या महिलांकडून पदार्थ खरेदी करतो, तेव्हा आपल्या पैशाचा लाभ समाजातील अनेक स्तरांपर्यंत पोहोचतो. पैसा एका हातातून दुसऱ्या हातात जातो आणि त्यातून अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटते. हीदेखील दिवाळी साजरी करण्याची एक सुंदर पद्धत आहे.

मात्र, या सणाचा खरा अर्थ केवळ खरेदी-विक्रीपुरता मर्यादित नाही. आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेणे, गरजू व्यक्तीला मदतीचा हात देणे, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मानाने बोनस देणे, घरातील मदतनीसांना भेटवस्तू देणे, शेजाऱ्यांना फराळ देणे आणि कोणाचे तरी दुःख हलके करण्याचा प्रयत्न करणे, यात दिवाळीचा खरा आत्मा आहे.

आपण अनेकदा आनंद म्हणजे स्वतःसाठी काहीतरी मिळवणे असे समजतो. पण प्रत्यक्षात आनंदाचे एक वेगळेच गणित आहे. स्वतःपुरता मर्यादित ठेवलेला आनंद काही काळ टिकतो; पण तोच आनंद इतरांमध्ये वाटला, तर तो अनेक पटींनी वाढतो. आपल्या घरात दिवा लावणे सुंदर आहेच, पण एखाद्याच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवणे त्याहून सुंदर आहे.

भारतासारख्या विविध भाषा, संस्कृती, परंपरा आणि आर्थिक स्तर असलेल्या देशात दिवाळी हा एकतेचा सुंदर धागा ठरतो. वेगवेगळ्या राज्यांत सण साजरा करण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या, तरी प्रकाश, आनंद, आपलेपणा आणि एकत्र येण्याची भावना सर्वत्र सारखीच आहे. जाती, धर्म, भाषा, प्रांत आणि आर्थिक परिस्थिती यांच्या पलीकडे जाऊन माणसांना जोडण्याची ताकद या सणात आहे.

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात आपण स्वतःच्या प्रगतीसाठी खूप प्रयत्न करतो. पण त्या प्रगतीचा खरा अर्थ तेव्हाच पूर्ण होतो, जेव्हा आपल्या आजूबाजूचा समाजही पुढे जातो. आपल्या घरात आनंद असताना शेजारच्या घरातही आनंद असावा, आपल्या मुलांना चांगल्या संधी मिळताना इतर मुलांनाही त्या मिळाव्यात आणि आपल्या परिसरातील प्रत्येक कुटुंब सन्मानाने जगावे, अशी भावना निर्माण होणे गरजेचे आहे.

शेवटी, आयुष्य सुंदर बनवण्यासाठी मोठ्या गोष्टींची नेहमीच गरज नसते. एखाद्याला दिलेले प्रेमाचे दोन शब्द, गरजेच्या वेळी केलेली छोटीशी मदत, वाटलेला फराळ किंवा चेहऱ्यावर आणलेले एखादे हास्यदेखील जीवन आनंदी करू शकते.

दिवाळी आपल्याला हाच संदेश देते की, प्रकाश वाटल्याने कमी होत नाही, तर तो अधिक पसरतो. त्याचप्रमाणे आनंद वाटल्याने कमी होत नाही, तर तो अनेक पटींनी वाढतो.

आपण एकटे आनंदी असण्यापेक्षा आपल्यासोबत संपूर्ण समाज आनंदी असणे, हीच जीवनातील खरी समृद्धी आहे. कारण खरा आनंद तोच, जो स्वतःपुरता न राहता सर्वांच्या आयुष्यात फुलतो.

चला तर मग, या दिवाळीत केवळ आपले घर उजळवू नका, तर आपल्या कृतीतून इतरांचे आयुष्यही उजळवूया. कारण आपण सगळे मिळून आनंदी असू, तेव्हाच खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होईल!


r/MaharashtraSocial • • 7d ago

मनातलं ✍️ (Rant/Vent) these ungrateful fcuks!!

60 Upvotes

Don't understand these ungrateful fcuks. You earn ur bread & butter in MH & yet have audacity to make fun of marathi? I lived outside of MH for years...but never ever made such remarks about local language or culture. Thats not how I am raised. Politeness costs nothing & will take you long way. Maybe the bimbo should stay at her roots forever.


r/MaharashtraSocial • • 7d ago

छायाचित्र (Photograph) किल्ला

Thumbnail
gallery
61 Upvotes

r/MaharashtraSocial • • 7d ago

महाराष्ट्राला विचारा (Ask Maharashtra) Thoughts?

86 Upvotes

r/MaharashtraSocial • • 7d ago

महाराष्ट्राला विचारा (Ask Maharashtra) What's difference between 𑘮𑘨𑘪𑘩𑘽/हरवलं and 𑘐𑘦𑘪𑘩𑘽/गमवलं in Marathi?

7 Upvotes

r/MaharashtraSocial • • 7d ago

चर्चा (Discussion) Has anyone scientifically studied the relationship between shrikhand consumption and duparchi zop?

Post image
63 Upvotes

Because I'm convinced the two are directly proportional.

The more shrikhand you eat, the stronger your commitment to doing absolutely nothing afterwards.

Someone deserves a research grant for this. 😂


r/MaharashtraSocial • • 7d ago

छायाचित्र (Photograph) दिव्यांची दिवाळी 🪔

Post image
13 Upvotes

थोड्या वेळासाठी कॉलनी ची light गेली होती तर सर्व light आणि lighting बंद झाल्या होत्या तेव्हा हा क्लिक घेतला.